संस्थेची माहिती

संस्थेची माहिती

संस्थेची स्थापना एका दुख:द प्रसंगातुन झाली आहे पेण मधील एका शिक्षकाच्या पत्नीचे आकस्मीक निधन झाले अशा परिस्थितीत की आधिच परिस्थीतीने गांजलेल्या त्या शिक्षका जवळ आपल्या प्रिय पत्नीचे अंत्यविधी करण्यासाठी पैसे नव्हते ही परिस्थिती पाहिल्यावर आपल्या शिक्षक बधुंवर उदभवलेल्या संकटात त्याला सहाय्य करण्यासाठी तेथील हेडमास्तरांनी 10 रू व इतर शिक्षकांनी प्रत्येकी 2रू जमा करून त्या शिक्षकाच्या पत्नीचे अंत्यविधी उरकला. त्या नंतर त्या शिक्षकाला आपतकाली सहाय्य व्हावे म्हणुन काही वर्गणी काढून रक्कम जमा केली या प्रसंगातुन या शिक्षक पतपेढीचे रोपटे जन्माला आले. ही कल्पना स्व. नारायण भिकाजी दाबके नावाच्या शिक्षकाला सुचली हा काल सन १९२२ चा होता.

संस्थेची स्थापना सुरूवातीला ८ शिक्षक सभासद व १८ रू भांडवलाने दि. ४ ऑगस्ट १९२४ रोजी रजिस्टर को.ऑप.सोसायटीज बॉम्बे प्रेसिडेन्सी अंडर सेक्शन ९ ऑफ ऍक्ट २ ऑफ १९१२ खाली करण्यात आली.

संस्थेचे सुरूवातीचे सभासद ८ होते व भांडवल १८ रू होते. संस्थेचे मुळ प्रवर्तक स्व. अ. वि. जोशी होते. तसेच पहिले चेअरमन स्व|कॄष्णाजी रामचंद्र तेरेदेसाई होते. संस्थेचे कार्यक्षेञ पेण शहरापुरते मर्यादित होते नंतर संपुर्ण पेण तालुका करण्यात आले. संस्थेचा वाढता पसारा पाहुन संस्थेचे कार्य क्षेञ त्या वेळचा कुलाबा जिल्हा करण्यात आला. सुरूवातील संस्था सभासदास त्याच्या पगाराच्या दुप्पट कर्ज देत असे व कर्जाचा व्याज दर सव्वा सहा टक्के होता. प्रथम दुबेरजीने कर्ज १९४५ साला पासून देण्यात येवु लागले. संस्थेचे प्रथम सेक्रेटरी स्व. नारायण भिकाजी दाबके हे होते. संस्थेचे प्रथम कार्यालय १ रू भाडयाने सुरू करण्यात आले नंतर पेणच्या मंडलिकांच्या माडीवर त्या नंतर आघारकरांच्या वाडयावर सुरू करण्यात आले. सन १९५८ सालापासून पतपेढीचे कार्यालय स्वमालकीच्या वास्तुत थाटण्यात आले त्या वेळी मयत सभासदास तातडीने २५ रू मयतफंड देण्यात येत असे.

संस्थेचा सुवर्णमहोत्सव ४ नोव्हेंबर १९७४ साली प्रा. अरूण दोंदे साहेबांच्या अध्यक्षतेखाली मा. वा. पु. वर्दे यांच्या हस्ते उदघाटनाने पदमश्री अनंत काणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. आता संस्था शतकमहोत्सवाकडे झेपावत आहे.

संख्या माहिती