सभासद योजना
संस्था सभासदांना पुरवीत असलेल्या योजना
सेवानिवृत्ती पुरस्कार योजना : जे सभासद निवृत्तीच्या वेळी १५ वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक काळ संस्थेचे सलग सभासद असतील अशा सभासदांना सेवा निवृत्ती नंतर सभासदत्वाचा राजीनामा दिल्यानंतर सभासदास रुपये ५०००/- मानधन व संस्थेकडून सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात येते
हुतात्मा हिरवे गुरुजी स्मृती शिष्यवृत्ती मदत योजना : संस्थेच्या सभासदांच्या पाल्यांना १२ वी च्या पुढील महाविद्यालीयनं उच्च शिक्षण घेत आहेत. अशा डिप्लोमा करीत असतील अशा सभासदांच्या मुलांना हु. हिरवे गुरुजी स्मृती शिक्षण मदत निधीतून दर वर्षी शैक्षणिक मदत दिले जाते.
सभासद कल्याण फंड योजना : संस्थेच्या सभासदांचे १००००/- रुपये कर्ज माफीसाठी कायमनिधीतून जमा केले आहेत. त्या सभासदांना या योजनेचा फायदा दिला जातो. एखादा सभासद आकस्मित मृत्यू पावल्यास त्यांची संस्थेकडे असणारी जमा रक्कम जमा करून उर्वरित शिल्लक कर्ज संस्थेकडून माफ केले जाते.
कर्जासाठी लागणाऱ्या बॉन्डची सुविधा : मा. संचालक मंडळ यांच्या शिफारीनुसार सभासदांना कर्जाच्या वेळी लागणाऱ्या बॉन्डची सुविधा संस्थेच्या प्रत्येक शाखेत पुरवली जाते. जेणे करून सभासदांचा वेळ वाचावा व सभासदांना वेळीस कर्ज मिळावे.
सभासदांच्या खात्याची माहिती : दरवर्षी आर्थिक वर्ष संपल्यानंतर सभासदांनी केलेल्या आर्थिक व्यवहार व त्यासारख्या संपूर्ण कर्जाची माहिती यांची प्रिंट प्रत्येक सभासदांस वैयक्तिक दिली जाते.
कायमनिधी व्याज व डिव्हिडंड खात्यावर जमा केला जातो : दर वर्षी सभासदांना कायमनिधी व्याज व डिव्हिडंड प्रत्येक्ष येऊन संस्थेच्या प्रत्येक शाखेत स्वतः येऊन घेऊन जावे लागत असे. सभासदांच्या या कामासाठी रजा खर्ची पडत असे म्हणून सभासदांच्या बँक खात्यावर डिव्हिडंड व कायमनिधी व्याज जमा करण्याची योजना सुरु केली आहे.